मुख्याध्यापक मनोगत

01 Oct 2025 16:57:08

principal-photo-medium

मनोगत:
पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात व सुरक्षित वातावरणात बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असणारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची विद्यापीठ हायस्कूल ही एक शाखा आहे. प्रशालेस प्रशस्त मैदान उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो, थ्रोबोल या खेळासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रशालेत अद्यावत संगणक कक्ष असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ई-लर्निंग ची सोय उपलब्ध आहे. तसेच क्रियाशील असा शिक्षक-पालक संघ व माजी विद्यार्थी संघ आहे त्यांच्या व्द्वारे शैक्षणिक साहित्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवली जाते. अभ्यासाबरोबरच अनेक संस्कारक्षम उपक्रम कला, क्रीडा, नाट्य, छोटे सायंटिस्ट, STEAM LAB इ. उपक्रमाचा समावेश आहे. जीवन कौशल्य व अभ्यासकौशल्ये विकसनासाठी समुपदेशन व मार्गदर्शन दिले जाते. सुट्टीत छंदवर्गाचे , हस्ताक्षर प्रकल्पाचे व अभ्नय शिबिराचेही आयोजन केले जाते.

मुख्याध्यापक : श्री विष्णू शामराव मोरे

Powered By Sangraha 9.0