विद्यापीठ हायस्कूलबद्दल

विद्यापीठ हायस्कूल    01-Oct-2025
Total Views |
slider-img-1
 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल शाखेची स्थापना १९८२ साली झाली. मुले व मुली या शाखेमध्ये सहशिक्षण घेत आहेत.
 
विद्यापीठ हायस्कूल ही २३ जून १९८२ साली शासनाची मान्यता असलेली, S.S.C. बोर्ड अभ्यासक्रम राबविणारी मराठी माध्यमाची खाजगी, १०० टक्के शासन अनुदानित शाळा आहे. प्रशालेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी मराठी व सेमी अशा दोन्ही मध्यामाची शाळा आहे.
 
पुणे विद्यापीठ परिसरातील सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची अडचण आणि वाहनांची गैरसोय या कारणाने विद्यापीठातील प्राध्यापकांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेशी संपर्क करून विद्यापीठ आवारामध्ये ही शाळा सुरू करण्यास विनंती केली. 127 वर्ष शिक्षण क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला शाळा सुरू करण्यासाठी पुणे विद्यापीठाने विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर दिला.
 
पुणे विद्यापीठातील परिसरात राहणाऱ्या मुलांसाठी ही शाळा शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. प्राध्यापकांच्या मुलांबरोबरच सेवकांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या, शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या योगदानाने पुण्यातील नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत शिक्षण घेऊन अनेक नामवंत कलाकार, अभिनेते , डॉक्टर, इंजिनिअर्स , समाजसेवक, उत्तम नागरिक व सेवक म्हणून आपले कार्य करत आहेत.
 
शाळेचा निसर्गरम्य परिसर, खेळासाठी प्रशस्त मैदान आहे. शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळते. शाळा CCTV निगराणी कक्षात आहे .त्यामुळे मुलांना सुरक्षित वातावरण मिळते. तसेच शासनमान्य सर्व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी सहभाग घेतात.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अद्ययावत संगणक कक्ष, ई -लर्निंग सुविधा, चित्रकला वर्ग, डिजिटल क्लास रूम्स आहेत.तसेच अद्ययावत प्रयोगशाळा स्वतंत्र आहे. वाचन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी परिपूर्ण असे ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांसाठी मूलभूत स्वच्छता सोयी, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. स्पोकन इंग्लिश, बाह्य स्पर्धा यांची उत्तम तयारी, कला नाट्य, वकृत्व , संगीत इत्यादी क्षेत्रात मुलांची तयारी करून घेतली जाते.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात शाळा असल्याने तेथील सर्व विज्ञान, भाषा, ललित कला केंद्र इत्यादी विभागातील तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक, सर्व विभागांची क्षेत्रभेट प्रत्यक्ष मुलांना मिळते. मुक्तांगण आयुका, PKCL, छोटे सायंटिस्ट इत्यादी विज्ञान कार्यक्रमात शाळेचा सहभाग असतो. माजी विद्यार्थी मेळावा घेतला जातो. सहशालेय उपक्रम, राष्ट्रीय सण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी घेतले जातात. सर्व गुणसंपन्न व उत्तम नागरिक बनविणे हे शाळेचे ध्येय आहे.